चिपळूण शहराचे सुपुत्र डॉ. सागर अरुण शिर्के यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाच्या वतीने आयोजित विशेष समारंभात त्यांना ‘विद्या वाचस्पती’ (मानद डॉक्टरेट – Ph.D.) ही पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा दिमाखदार समारंभ नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ. सागर शिर्के यांच्या शैक्षणिक, सामाजिक व बौद्धिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. किरण बोंगले आणि डॉ. अनिल मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
डॉ. सागर शिर्के यांना दिल्लीत मिळालेल्या या प्रतिष्ठित पदवीबद्दल संपूर्ण चिपळूण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चिपळूणच्या नावाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केल्याबद्दल नागरिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवाराने त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.
डॉ. सागर शिर्के यांच्या या यशामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













