चिपळूणच्या कन्येची जागतिक विश्व विक्रमासाठी निवड

banner 468x60

चिपळूणची कन्या गार्गी पराग पुरोहित दुहेरी लाठी फिरवण्याच्या सांघिक प्रकारात जागतिक विश्व विक्रमासाठी निवड झाली आहे. हा विश्व विक्रम मुंबईतील शिव शंभो मर्दानी आखाडे येथे आयोजक सुधीर कांबळे यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.

banner 728x90

सदर कार्यक्रमात आय.ए.एस., आ.पी.एस. अधिकारी, स्थानिक माननीय खासदार व आमदार तसेच युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे एशियन चिफ एडिटर शब्बाबी मंगल उपस्थित राहणार आहेत.


गार्गीच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी स्थानिक नागरिक व खेळप्रेमी उत्साही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चौक मिञ मंडळ चिंचनाका चे किशोर खेडेकर व सहकारी यांनी तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत, “चिपळूणच्या नावाला देश-विदेशात गौरव मिळेल,” असे म्हटले.
सदर कार्यक्रमासाठी अनेक पदाधिकारी आणि खेळ संघटनांच्या नेत्यांनी गार्गीला शुभेच्छा दिल्या.

त्यात भारतीय लाठी महासंघाचे उपाध्यक्ष सुरेंद्र शिंदे, लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष उत्तम पाटील, उपाध्यक्ष संगम चव्हाण, सहसचिव शामल आंजर्लेकर, कोषाध्यक्ष प्रशांत पांडे, सदस्य रूणाली पवार, राष्ट्रीय लाठी पंच कविता शिंदे, सुनील लाकडे, तसेच ट्रेडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीचे उपाध्यक्ष अमोल धयाळकर, देवी चव्हाण आणि स्वप्निल भीडे आडिवरे यांचा समावेश होता. सर्वांनी गार्गीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, तिच्या यशामुळे चिपळूणला आणि रत्नागिरी जिल्ह्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त होईल, असे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *