चिपळूण : गाव विकास समिती कडून चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर

चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर

banner 468x60

सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला उमेदवारी देत गाव विकास समिती कडून सामान्य जनतेच्या हिताच्या राजकारणाला सुरुवात


गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटने कडून अखेर चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी सौ.अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी यावेळी चिपळूण संगमेश्वर मध्ये महिला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. ऍड.सुनील खंडागळे हे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरतील असेही संघटनेने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या वतीने चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या आधीच झालेला आहे. संघटनेच्या कोअर कमिटीने इच्छुक उमेदवारांपैकी दोन उमेदवारांची नावे,एडवोकेट सुनील खंडागळे व अनघा राजेश कांगणे यांची नावे अंतिम निर्णयासाठी संघटना नेतृत्वाकडे पाठवली होती.

या दोन्ही नावांचा विचार संघटनेने केला. यापैकी सौ.अनघा कांगणे यांची उमेदवारी संघटने कडून निश्चित करण्यात आली.


रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामान्य नागरिक,महिलांना न्याय देण्यासाठी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचं दुःख/समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक सक्षम महिला उमेदवार या विधानसभा निवडणुकीत द्यावा असा निर्णय गाव विकास समिती संघटनेचा अध्यक्ष म्हणून उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे आम्ही दोघांनी

गाव विकास समितीच्या कोअर कमिटीशी चर्चा करून घेतला असल्याचे उदय गोताड यांनी याबाबत बोलताना सांगितले.


चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने सौ.अनघा राजेश कांगणे यांना गाव विकास समितीची उमेदवारी आम्ही जाहीर करत आहोत, संघटनेचे कायदेविषयक सल्लागार एडवोकेट सुनील खंडागळे हे या निवडणुकीत डमी उमेदवार म्हणून अर्ज भरतील, असा निर्णय संघटनेचा झाला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटली आहे.

मतदार संघातील मुद्द्यांना केंद्रस्थानी मानून ही निवडणूक लढण्याचा निर्णय गाव विकास समितीने घेतला असल्याचेही उदय गोताड यांनी म्हटले आहे.

कोण आहेत सौ.अनघा कांगणे
◆ गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या महिला उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.
◆ शिक्षण – M.A बीएड,
◆सात वर्ष खाजगी शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून काम.
◆बारा वर्षाहून अधिक काळ देवरुख,संगमेश्वर भागात सामाजिक कार्यात सक्रिय.
◆कबड्डी व क्रीडा क्षेत्रात योगदान

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *