चिपळूण येथील वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका अल्पवयीन तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे असे या दुर्घटनेतील पंधरा वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा घारे व त्याचे अन्य चार मित्र पोहण्यासाठी वाशिष्ठी नदीपात्रामध्ये गेले होते. उकाड्यामुळे हैराण झालेल्या या मुलांनी वाशिष्ठीत पोहण्याचा बेत केला होता. त्यानुसार सायंकाळी ते वाशिष्ठी नदीपात्रात उतरले.

मात्र, यावेळी वाशिष्ठी नदीच्या उधाणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तलहा हा अल्पवयीन तरूण नदीपात्रात बुडू लागला. आपला मित्र बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेले इतर मित्र त्यावेळी घाबरून गेले. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी कोणीही जावू शकले नाही.
यावेळी या मुलांनी आरडाओरड केली व मदत मागितली.
यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी नदीकिनारी धाव घेत किनाऱ्यावर असलेल्या बोटी सोडून बुडालेल्या तलहाचा शोध घेण्यास सुरुवात केली. याची माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना देण्यात आली. तत्काळ घटनास्थळी पोलिस कर्मचारी दाखल झाले.
स्थानिक बोटचालकांच्या मदतीने वाशिष्ठी नदीपात्रात मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तब्बल अर्ध्या तासानंतर त्याचा मृतदेह वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला.
यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













