उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील सक्रिय नेते आणि यशस्वी व्यावसायिक उमेश खताते हे येत्या ७ एप्रिल रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या राजकीय निर्णयामुळे खेर्डी परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे.
उमेश खताते हे गेली अनेक वर्षे राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रिय राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे हाती घेत, सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांची एक लढवय्या आणि जनसंपर्क असलेली कार्यकर्ता-नेता अशी ओळख निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे गटात कार्यरत असताना त्यांनी युवा सेनेचे तालुकाप्रमुखपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर मोठे काम केल्याचे मानले जाते. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी खेर्डी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
दरम्यान, राज्यातील बदलते राजकीय समीकरण, स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय रणनीती आणि कार्यकर्त्यांचा दबाव याचा विचार करून त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ते आपल्या सहकाऱ्यांसह अधिकृतरित्या शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार आहेत.
उमेश खताते यांच्या या प्रवेशामुळे खेर्डी आणि परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













