चिपळूण तालुक्यातील मुंढे-सावंतवाडी येथे २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीपेश सुदेश सावंत (वय २३, रा. मुंढे-सावंतवाडी, ता. चिपळूण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या घरातील बेडरूममध्ये छताच्या पंख्याला कापडाच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. काही वेळाने ही बाब घरातील सदस्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच अलोरे-शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सायंकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी या प्रकरणाची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली.
अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














