खेर्डी येथील सुप्रिया संतोष उतेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली.
सुप्रिया उतेकर यांनी यापूर्वी खेर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य केले आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पक्ष संघटनेत नवीन चेहऱ्यांना संधी देत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
शासनाच्या विविध योजना, केंद्र व राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, पक्षाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करणे या उद्देशाने त्यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी सुप्रिया उतेकर सर्वांना एकत्रित घेऊन काम करतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सुप्रिया उतेकर यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















