पुणे ते गणपतीपुळे असा प्रवास करणाऱ्या एका कुटुंबावर २५ ऑक्टोबर २०२५ रोजी चिपळूण तालुक्यातील खेरशेत श्री लॉजजवळ काळाने घाला घातला. दुपारी १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास झालेल्या या मोटार अपघातात फिर्यादी योगेश यशवंत उत्तरेकर यांच्या गाडीतील संगीता मोरे जखमी झाल्या असून, निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या दुसऱ्या गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विद्यानगर, एअर पोर्ट रोड येथील गुडविल क्लासिक सोसायटीत राहणारे योगेश उत्तरेकर (वय ३१) हे स्वतःची हुंडाई आय १० NIOS कार (क्र. MH-29-CB-6064) घेऊन गणपतीपुळेकडे जात होते. खेरशेत श्री लॉज या ठिकाणी त्यांची गाडी पोहोचली असतानाच, त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वॅगनार कार (क्र. ग्क्त-२३-एक्-७४२२) वरील चालक राहुल संपत खाडे (रा. पनवेल, जिल्हा रायगड) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले.
खाडे यांनी अत्यंत हयगयीने गाडी चालवत उत्तरेकर यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.
या अपघातात उत्तरेकर यांच्या गाडीच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले. गाडीत प्रवास करणाऱ्या संगीता हरिश्चंद्र मोरे या अपघातात जखमी झाल्या आहेत.
योगेश उत्तरेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५/१०/२०२५ रोजी १४.५१ वाजता चिपळूण पोलिस ठाण्यात आरोपी राहुल संपत खाडे याच्याविरुद्ध गुन्हा (गु.आर.नं. १०४/२०२५) दाखल करण्यात आला आहे. राहुल खाडे याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













