उक्ताड-गुहागर नाका डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आलं आहे. ८ जानेवारीला झालेलं रस्त्याच्या कामावर प्रश्न निर्माण झाले आहेत.
चिपळूण पालिका हद्दीतील उक्ताड ते गुहागर नाका दरम्यानच्या रस्त्यावर सीलकोटचे काम करीत ठेकेदाराने रस्त्याच्या कामाला चुना लावला आहे.

पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत अडीच वर्षापूर्वी शहरातील उक्ताड मराठी शाळा ते गुहागर नाका दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता.


आता ही या रस्त्याची दुरुस्ती केली गेलीय मात्र पालिकेने डांबराचा केवळ फवारा मारल्याचं समोर आलं आहे. ८ दिवसात हे डांबर रस्त्यावर दिसेनासं झालंय. त्यामुळे या कामाची तपासणी व मोजमाप करावी.

यामध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांनी केली आहे. या रस्त्याचे काम कोणताही नियमाला धरून करण्यात आले नसून यामध्ये साइड पट्ट्या करण्यात आलेल्या नाहीत.
खडीचा वापर जेमतेमच करून माती मिश्रित डांबराचा वारेमाप वापर करण्यात आला आहे. यावर पाणी तर मारण्यात आलेच नाही, या कामाची असून चौकशी केल्याशिवाय बिले अदा करण्यात येवू नयेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्याच्या बांधकामाची चौकशी क्वाॅलिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













