चिपळूण : मयूर कांबळे बॅडमिंटन अकॅडमीची खेळाडू, सानिका सुतारची राष्ट्रीय पातळीवर झेप

banner 468x60

मयूर कांबळे बॅडमिंटन अकॅडमीची होतकरू खेळाडू सानिका सुतार हिने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. सानिकाची नॅशनल तसेच ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ साठी निवड झाली असून, या यशामुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

banner 728x90


२५ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेज, लवळे येथे वेस्ट झोन युनिव्हर्सिटी बॅडमिंटन टूर्नामेंट आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सानिकाने MIT WPU कॉलेजचे प्रतिनिधित्व केले. अत्यंत चुरशीच्या लढतीत सानिका आणि तिच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला.


या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सानिकाची थेट राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तसेच ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ साठी निवड झाली आहे. तिच्या या यशामागे कठोर सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा मोलाचा ठरला आहे.


सानिकाच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि अकॅडमीकडून तिचे अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *