चिपळूण तालुक्यातील कान्हे कदमवाडी येथे एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (२९ मार्च) उघडकीस आली. श्वेता राजेश कदम (वय ३५, रा. कान्हे कदमवाडी, ता. चिपळूण) असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजण्यापूर्वी ही घटना घडली. श्वेता कदम यांनी आपल्या राहत्या घरातील मजघरात असलेल्या आयबीमला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. काही वेळानंतर घरातील सदस्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांना तातडीने खाली उतरविण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती तत्काळ शिरगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी अलोरे पोलीस दूरक्षेत्रांतर्गत शिरगाव पोलीस ठाण्यात २९ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ तसेच आमृ. क्रमांक ०७/२०२६ अन्वये नोंद घेऊन पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक, वैयक्तिक किंवा इतर कोणत्या कारणांमुळे ही घटना घडली का, याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे कान्हे कदमवाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













