चिपळूण तालुक्यातील पेढांबे पूल परिसरात बेकायदा सुरू असलेल्या जुगारप्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात जुगार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत आरोपीकडून १,२२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रवींद्र शिवराम कदम (वय ५१, रा. पिंपळी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी येथील दीपक राजेश पाटील यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कदम हा नागरिकांकडून पैसे स्वीकारून कोणतीही परवानगी न घेता कल्याण मटका जुगाराचा खेळ स्वतःच्या फायद्यासाठी चालवत असल्याचे आढळून आले. या कारवाईदरम्यान तो रंगेहाथ पकडण्यात आला.
या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अलोरे शिरगाव पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













