चिपळूण : दुचाकीचा अपघात, दोघे तरुण जखमी

banner 468x60

मुंबई–गोवा महामार्गावर सावर्डे येथे दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघे तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या फलकावर आदळल्याने दोघांनाही दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

banner 728x90 banner 728x90

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेय जगन्नाथ बोल्ये (वय २२, रा. रामटेकडी डोंगर विभाग, शिवडी, मुंबई; मूळ रा. ताम्हाणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा युवक युनिकॉर्न (क्र. एमएच-४७-सीबी-०७८८) या दुचाकीवरून मुंबई–गोवा महामार्गाने मुंबईहून राजापूरकडे जात होता. त्याच्यासोबत यश सहदेव बोल्ये (वय २४, रा. ताम्हाणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा तरुण मागे बसलेला होता.

सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास सावर्डे येथील ‘हेवन हॅप्पी पंजाबी धाबा’समोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या फलकावर जोरात आदळली. या अपघातात चालक अमेय बोल्ये याला गंभीर दुखापत झाली, तर मागे बसलेला यश बोल्ये यालाही किरकोळ दुखापत झाली.

अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून स्थानिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *