चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागातील अपरांत सुपर स्पेशालिटी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ फिजिशियन डॉ. शशिकांत गायकवाड हे नुकतेच पूर्णवेळ फिजिशियन म्हणून रुजू झाले आहेत.
डॉ. गायकवाड यांनी मुंबईतील प्रतिष्ठित जे. जे. हॉस्पिटलमधून एम.डी. (मेडिसिन) ही पदवी प्राप्त केली असून क्षयरोग व छातीचे विकार या विषयात विशेष प्रशिक्षण (DTCD) घेतले आहे. मागील ३० वर्षांच्या वैद्यकीय सेवेत त्यांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल पुणे, चेस्ट हॉस्पिटल पुणे आणि रुबी हॉस्पिटल पुणे या नामांकित रुग्णालयांमध्ये हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ — डॉ. शशांक जोशी, डॉ. फारूख उडवाडिया, डॉ. बी. के. गोयल, डॉ. पी. के. ग्रँट, डॉ. ओ. पी. कपूर, डॉ. अस्पि गोलवाला आणि डॉ. प्राची साठे यांच्यासोबत कार्य करण्याचा सन्मान मिळवला आहे.
डायबिटीज, हृदयरोग, मेंदूचा झटका (स्ट्रोक), स्थूलत्व अशा विविध आजारांच्या उपचारात त्यांना प्रदीर्घ अनुभव असून 2D इको तपासणीत त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यांच्या सेवेमुळे आता हृदयविकारांपासून ते जटिल श्वसनरोगांपर्यंतच्या सर्व उपचारांसाठी चिपळूणवासीयांना एक सक्षम व कुशल तज्ज्ञ उपलब्ध झाला आहे.
अपरांत हॉस्पिटल गेली सात वर्षे चिपळूणच्या जनतेला गुणवत्तापूर्ण आणि तत्पर आरोग्यसेवा देत आहे. या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून डॉ. गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
रुजू स्वागत प्रसंगी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. यतिन जाधव आणि कार्यकारी डायरेक्टर डॉ. अब्बास जबले उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. गायकवाड यांचे स्वागत करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि चिपळूणवासीयांना अनुभवी व ज्येष्ठ कन्सल्टंट मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













