रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्ह्य परिषद आणि नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालं असून अनेक नेत्यांची राजकीय समीकरणे बदलली आहेत, काहींचे स्वप्न भंगले तर काहींना नवी संधी मिळाली. कोकणात आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची चढाओढ निर्माण झाली आहे.
चिपळूण नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम हे आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. या बातमीमुळे संपूर्ण चिपळूणमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सतीश कदम यांचा प्रामाणिक पत्रकारितेचा प्रवास
सतीश कदम हे गेली अनेक वर्षे निपक्षपाती, निर्भीड आणि सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता करत आहेत. स्थानिक प्रशासन, विकासकामांतील दिरंगाई, पूरनियंत्रण, आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांच्या पत्रकारितेच्या कामगिरीमुळे अनेक सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाला हालचाल करावी लागली आहे.
सतीश कदम पूर काळातील कार्य, स्वतःचं नुकसान सोसून इतरांसाठी धावले
२०२१ साली चिपळूणमध्ये आलेल्या भीषण महापुरात सतीश कदम यांच्या स्वतःच्या घरात पाणी शिरले होते. मात्र, त्यांनी स्वतःच्या घराची पर्वा न करता शेकडो नागरिकांच्या मदतीसाठी स्वतःला झोकून दिलं. वस्त्या-वस्त्यांमध्ये जाऊन मदतकार्य, अन्न-वाटप, आणि पूरग्रस्तांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणं हे त्यांनी प्रामाणिकपणे केलं.
सतीश कदम उपोषण करुन चिपळूण बचाव समितीचं नेतृत्व
पूरमुक्त चिपळूणसाठी त्यांनी पुढाकार घेत ‘चिपळूण बचाव समिती’च्या वतीने तब्बल २९ दिवस गाळ उपसण्यासाठी उपोषण केलं. प्रशासनाने दुर्लक्ष केलेल्या गाळ उपशावर त्यांनी आवाज उठवला आणि हा विषय राज्यस्तरावर गाजवला. यामध्ये त्यांची भूमिका नेतृत्वदायी आणि संघर्षशील होती.
सतीश कदम यांच्या संभाव्य उमेदवारीने चिपळूणमधील प्रस्थापित राजकीय पक्षांची चिंता वाढली आहे. एका बाजूला जनतेशी थेट संपर्क असलेला चेहरा, आणि दुसऱ्या बाजूला स्वच्छ प्रतिमा, हे दोन घटक अनेक मतदारांना आकर्षित करत आहेत. त्यांच्या उमेदवारीने प्रस्थापित उमेदवारांच्या संभाव्यता धोक्यात येऊ शकतात, अशी चर्चा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चिपळूणमधील विविध सामाजिक संघटना, युवक मंडळं, व्यापारी वसाहतीतील प्रतिनिधी यांच्याकडून सतीश कदम यांच्या नावाची नगराध्यक्ष पदासाठी जोरदार मागणी केली जात आहे. त्यांच्या “कृतिशील आणि स्वच्छ” प्रतिमेमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की, सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेणारा, रस्त्यावर उतरणारा नेता हवा — आणि सतीश कदम त्या योग्यतेचे आहेत अशी चर्चा आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













