चिपळूण : भरधाव दुचाकीची टेम्पोला धडक

banner 468x60

चिपळूणमध्ये भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने टेम्पोला दिलेल्या धडकेची घटना मंगळवारी खांडोत्री येथे घडली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90


उदय शैलेश पटेल (रा. गुहागर) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून औदुत सोमा भागडे (वय ३१, रा. आंबिटगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी औदुत भागडे हे आपल्या ताब्यातील टेम्पो पाते पिलवली येथून आंबिटगावकडे नेत होते.

दरम्यान, खांडोत्री येथे गांगण यांच्या पोल्ट्रीजवळील वळणावर आल्यानंतर समोरून येणारा दुचाकीस्वार उदय पटेल यांनी रस्ता वळणाचा असतानाही भरधाव वेगाने व चुकीच्या दिशेने उजवीकडे येत टेम्पोला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार उदय पटेल जखमी झाला आहे. घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *