१) सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५.६६ मी म्हणजेच इशारा पातळीवर आहे.
२) कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३५.२० मी. आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी ८ पासून आज ८ पर्यंत म्हणजे २४ तासामध्ये २२० मिमी पाऊस पडलेला आहे. नवजा येथे काल ८ वा पासून आज ८ वाजेपर्यंत ३१६ मिमी पाऊस पडलेला आहे. आज सकाळी ८ ते ३.३० या वेळेत ११० मिमी पाऊस पडलेला आहे. एक मशिन सुरू आहे.
३) दुपारी ३ः५० वा ओहोटी आहे. संध्याकाळी ०८ः०९ वा ३.३३ मी ची भरती आहे.
४) ११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत. ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत.
५) बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका , वडनाका, आईस फॅक्टरी, पेठमाफ इंडियन जीम या भागात एक ते दीड फूट पाणी आलेले आहे.
६) सखल भागातील विद्युत पुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेला आहे.
७) नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
८) कोळकेवाडी धरण्याच्या मशीन ५.३० वा बंद करण्यात आलेल्या होत्या परंतु कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने १ः१० वा एक मशीन सुरू करण्यात आलेली आहे व ते पाणी शहरामध्ये २ वा येईल.
९) दसपटी भागातील पावसाचा जोर कमी झालेला आहे ही दिलासादायक बाब आहे. सर्व नागरिकांना पुढील ८ तास सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
१०) खेर्डी ते हेळवाक वाहतूक सुरू झालेली आहे. हेळवाक येथे रस्त्यावर पाणी साचल्याने हेळवाक-कराड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. मिरजोळीमध्ये गुहागर रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे.
११) आज दिनांक १९.०८.२०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.
१२) कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे.
१३) मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















