चिखलगाव : लोकसाधना फेस्टिवल – स्नेहसंमेलन 2025 एकोप्याचा, आपुलकीचा आणि आनंदाचा उत्सव

banner 468x60

लोकसाधना संस्था संचलित लोकमान्य टिळक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, चिखलगाव येथे लोकसाधना फेस्टिवलअंतर्गत आयोजित स्नेहसंमेलन २०२५ हा कार्यक्रम केवळ औपचारिक आयोजन न राहता लोकसाधना कुटुंबातील प्रत्येक घटकाला एकत्र बांधणारा आपुलकीचा व एकोप्याचा उत्सव ठरला.

आनंद, उत्साह आणि शिस्त यांचा सुंदर संगम या स्नेहसंमेलनात अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमात सर्व विभागांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला.

banner 728x90

स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरलेली खाऊ गल्ली येथे प्रेमाने तयार केलेले रुचकर पदार्थ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या उपक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या हॉस्टेल टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.


कार्यक्रमाला वेगळीच शोभा लाभली ती नाविन्यपूर्ण स्टेज सजावट व सुनियोजित व्यवस्थापनामुळे. यामध्ये VRTF टीमचे योगदान उल्लेखनीय ठरले.


या वर्षीचा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी क्षण म्हणजे धनश्री मॅडम यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला ‘अभिनव आदर्श विद्यार्थी पुरस्कार’. विद्यार्थ्यांना आदर्श मूल्यांची जाणीव करून देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला.


विद्यार्थ्यांप्रमाणेच वय विसरून सादरीकरण करणारी ज्युनिअर कॉलेज टीम, लहान मुलांसाठी डोरेमॉन व मिकी माउसच्या सादरीकरणातून आनंद पसरवणारा माध्यमिक विभाग, तसेच प्रेमाने नाश्ता व भोजन वाढणारी टीम सावित्री यांच्या योगदानामुळे स्नेहसंमेलन अधिक आपुलकीचे झाले.
खरेदी, नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सातत्याने कार्यरत असलेले संस्था व शाळा कार्यालय, तसेच वाहन विभाग हे या यशाचे मजबूत आधारस्तंभ ठरले.


या संपूर्ण कार्यक्रमाला दिशा देणारे संस्थेचे अध्यक्ष. कैवल्य दांडेकर, विश्वस्त. दिनेश आडविलकर चेतना बाळ यांच्या मार्गदर्शनामुळे स्नेहसंमेलन यशस्वी झाले. तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन करणारे माजी अध्यक्ष डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर यांचेही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.


लोकसाधना स्नेहसंमेलनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, लोकसाधना ही केवळ संस्था नसून माणुसकी, संस्कार आणि आपुलकी जपणारे एक मोठे कुटुंब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *