चिखलगाव : दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला चिखलगाव ते बोरिवली, आडीवाडी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन

banner 468x60

दापोली तालुक्यातील चिखलगाव ते बोरिवली आडीवाडी रोडवर काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. चिखलगाव ते बोरिवली आडीवाडी भरदिवसा नागरिकांना बिबट्याचे (Leopard News) दर्शन घडले.

यामुळे शेतकरी व परिसरात येणाऱ्या शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी पहाटे 8 वाजता बिबट्याचं दर्शन झालं आहे. कधी दिवसा तर कधी रात्री प्रवास करणाऱ्या नागरीकांना हा बिबट्या दिसुन येतोय दरम्यान बोरिवली आडीवाडी गावातील नागरिकांना बिबट्या खुप वेळा दिसुन आला आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

banner 728x90

बिबट्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे बोरिवली आडीवाडी रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत आहे.

यामुळे बिबट्याकडून मनुष्यावर हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. वनविभागाने याबाबत दखल घ्यावी, तातडीने या परिसर पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *