दापोली :केळशी येथे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून मूरघास प्रात्यक्षिक

banner 468x60

​ दापोली- दापोली कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) दापोली तालुक्यातील केळशी येथे कार्यरत असलेल्या

banner 728x90

इंद्रधनू गटाच्या विद्यार्थिनींनी शेतकरी जगदीश कुळे यांच्या शेतात मूरघास (Silage) बनविण्याचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवले.​

या प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना मूरघास बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली.

मूरघास बनवण्यासाठी सर्वप्रथम ०.५ लिटर पाणी, २०० ग्रॅम गूळ, ५० ग्रॅम मीठ आणि ५० ग्रॅम युरिया यांचे द्रावण तयार करण्यात आले.

त्यानंतर १० किलो गवत जमा करून त्याचे लहान तुकडे करण्यात आले. एका सिलो बॅगमध्ये ताज्या बारीक केलेल्या गवताचा थर भरून त्यावर तयार केलेले द्रावण शिंपडण्यात आले आणि ही प्रक्रिया क्रमाने सुरू ठेवली.

हवेचा प्रवेश टाळण्यासाठी नंतर ती बॅग दाबून बंद करण्यात आली आणि घट्ट बांधली गेली. विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना सांगितले की, साधारण २ ते ३ महिन्यांनी ही पिशवी उघडावी आणि तयार झालेला मूरघास जनावरांना खाण्यास द्यावा.​

यावेळी शेतकऱ्यांना मूरघासची पोषणमूल्ये, जनावरांच्या पशुखाद्यातील त्याचा योग्य वापर, दूध उत्पादन वाढवण्यातील त्याची भूमिका आणि त्याचे विविध फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या यशस्वी प्रात्यक्षिकासाठी डॉ. नरेंद्र प्रासादे यांचे मार्गदर्शन लाभले. मूरघास प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *