कोळकेवाडी धरण व धरण परिसरात काल रात्री ८ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.सद्यस्थितीत महाजेनकोचे…
चिपळूण

खेड : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित
खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. खेड तालुक्यात १५१ मिमी पावसाची नोंद…

चिपळूण : परशुराम घाटात दरड कोसळली
चिपळूण : जोरदार पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 प्रतिनिधीवेगवान बातमी,…

कोकणात पूरस्थिती, रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये काय स्थिती आहे? जाणून घ्या
कोकण पट्टयात मुसळधार पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, परिणामी पश्चिम किनारपट्टीवर पाऊस सुरू आहे. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहतायत. त्यामुळे पूर सदुश्य स्थितीनिर्माण झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मागच्या दोन–तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरीजिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर आहे. सलग दुसऱ्यादिवशी वारे 50 ते 55 किमी वेगाने वाहतय. बंगालच्या उपसागरात दाबनिर्माण झालाय. त्यामुळे पश्चिम किनारकपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. चिपळून शहर आणि परिसरात मुसळधार पाऊसकोसळतोय. वशिष्ठ नदीला पूर आलाय. चिपळून शहरात सखल भागात पाणी साचलय. रात्री एनडीआरएफच पथक दाखलझालय. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिलाय. शिव नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. आसपासच्या परिसरातमुसळधार पाऊस कोसळतोय. पु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. खेडमध्ये जगबुडीनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रतिनिधीवेगवान बातमी,…

चिपळूण : सावर्डेत घरावर कलंडला कंटेनर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील वहाळ फाटा येथे रस्त्यालगतच्या घरावर कंटेनर कलंडल्याची घटना आज, बुधवारी…

चिपळूण : फुटबॉल खेळायला जातो, असं घरी सांगून गेले माञ परतलेच नाहीत
कुंभार्ली येथील नदीत चिंब भिजण्यासाठी गेलेल्या 8 विद्यार्थ्यांपैकी दोघेजण बेपत्ता झाले होते. त्या दोघांचे मृतदेह शिरगाव येथीलवाशिष्ठी नदीत सापडले आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 तब्बल 24 तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश आले आहे.रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारासकुंभार्ली येथे वाशिष्ठीच्या डोहात ही दुर्घटना घडली. सहा मुलांनी भिजल्यानंतर काही वेळात पाऊस आल्याने जवळच्या छपराखालीआसरा घेतला. मात्र, कादिर लसणे व आतिक बेबल हे दोघे याच ठिकाणी डोहात थांबले. मात्र, काही वेळाने वरच्या बाजूला जोरातपाऊस झाल्याने मोठे पाणी आले. यावेळी हे दोघे पाण्यात बुडाले. वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेलीती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते. या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडेधाव घेतली. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. रात्री उशिरा पाऊस व अंधारामुळे शोधकार्य राबविणे शक्य झाले नाही. सकाळच्यावेळी महाड येथून प्रशांत साळुंखे यांच्या रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. यानंतर जयगड येथून कोस्टगार्डची टीमहीदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कुंभार्ली येथे दाखल झाली आणि त्यांनीही ऑक्सीजन व कॅमेरे लावून डोहात उतरून शोधकार्य सुरूकेले. मात्र, उशिरापर्यंत डोहामध्ये मृतदेह सापडत नव्हते. या टीमने खूप प्रयत्न केले. घळीमध्ये बांबू टाकून देखील पाहण्यात आले. मात्र, मृतदेह सापडले नाहीत. यानंतर पुन्हा एकदा नदीपात्रालगत शोध मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी 4 वाजण्याच्यादरम्यान यातील एका विद्यार्थ्याचा मृतदेह शिरगाव येथील वाशिष्ठी नदीत आढळला. त्यानंतर दुसर्याचा शोध सुरू झाला आणि5:30 वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील नदीतच पात्राच्या किनार्यावर दुसर्या मुलाचा मृतदेह आढळला. यानंतर हे शोधकार्यथांबले. दोन्ही मृतदेह शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह पालकांच्याताब्यात देण्यात येणार आहेत. शाळेला सुट्टी असल्याने मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शिकणारे इयत्ता दहावीतील आठ विद्यार्थी नदीत चिंबभिजण्यासाठी गेले होते. मात्र, घरामध्ये त्यांनी आपण फूटबॉल खेळायला जातो असे सांगितले होते. यामध्ये इब्राहिम काजोरकर(गोवळकोट), अब्रार हुसेन आंचरेकर (गोवळकोट), फरहान हिदायत पिलपिले (खाटीक आळी चिपळूण), अली नियाज सनगे (रा. बेबल मोहल्ला), जहिद हनीफ खान (रा. कोंढे चिपळूण), आरमान अजीज खान (रा. भेंडीनाका चिपळूण), आतीक इरफान बेबल(रा. बेबल मोहल्ला, अब्दुल कादीर नौशाद लसणे (रा. जिव्हाळा सुपर बाझार) हे विद्यार्थी भिजण्यासाठी नदीवर गेले होते. मात्र, त्यातील दोघेजण बुडाल्याने चिपळूण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील चिपळुण तालुका मुस्लीम संघटनेचे अध्यक्ष नाझीमअफवारे, शाहनवाज शाह तसेच शिरगाव व चिपळूण पोलिस यांनी घटनास्थळी शोधकार्य सुरू केले. सोमवारी (दि.10) सकाळीजेसीबी पाठवून डोहाकडे येणारे नदीचे पाणी तीन बांध घालून वळविण्यात आले. तसेच डोहामध्ये साचलेले पाणी बाहेरकाढण्यासाठी प्रवाह निर्माण करण्यात आला. त्याआधी महाड येथील रेस्क्यू टीम, काही स्थानिक ग्रामस्थ यांनी शोधण्याचा प्रयत्नकेला. मात्र, हाताला काही लागले नाही. …

चिपळूण : वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर, 70 वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाही विचार नकरता या डोहात उडी घेतली
वाचवा–वाचवा म्हणून आरडाओरड झाल्यानंतर जवळच थांबलेली ती सहा मुले धावली. मात्र, तोपर्यंत हे दोघे पाण्यात बेपत्ता झाले होते. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 या घटनेचे वृत्त चिपळुणात समजताच अनेकांनी कुंभार्लीकडे धाव घेतली. माञ ही सर्व माणसं येईपर्यंत तिथेच जवळ असलेल्या जयराज थरवळ यांनी हा आवाज ऐकताच त्यांचा शोध घेण्यासाठी सत्तर वर्षीय पट्टीचे पोहणारे जयराज थरवळ यांनी कसलाहीविचार न करता या डोहात उडी घेतली. त्यांनी अनेकवेळा या ठिकाणी उडी घेऊन अनेकांना वाचविल्याचे सांगितले जाते. मात्र, वयोमानानुसार त्यांनाही दमछाक झाल्याने ते बाहेर आले. यानंतर त्यांचा मुलगा गणेश थरवळ यानेदेखील डोहात उडी मारूनशोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. माञ पाण्याचा वेग जास्त असल्याने दोघांनाही ही मुलं सापडली नाहीत. कुंभार्ली येथील हा डोह प्रसिद्ध आहे. स्थानिक म्हणजेच अलोरे, शिरगाव, पोफळी, कुंभार्ली आदी गावातील मुले या ठिकाणी पोहतअसतात. मात्र, स्थानिकांना येथील पाण्याचा अंदाज असतो. चिपळुणातून पोहण्यासाठी गेलेल्या या दहावीतील विद्यार्थ्यांनापाण्याचा अंदाज आला नाही. त्यात दोघे बुडाले. प्रतिनिधीवेगवान बातमी, अचूक…

चिपळूण : अखेर दोन्ही मृतदेह सापडले, आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने
चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा…

चिपळूण : अखेर अब्दुल कादिर लसने याचा मृतदेह सापडला
चिपळूणमधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने या दोघांपैकी अब्दुल कादिर लसने याचा मृतदेह सापडला…

चिपळूण : अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका कोकण कट्टाचं आवाहन
चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहा जण बचावले आहेत. 🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या आपल्या मोबाईलवर* https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi 👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909 या घटनेचीमाहिती चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध कार्य सुरु केलं. अद्याप कोणाचाही मृतदेह सापडलेला नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका प्रशासनाचं आवाहन केलं आहे. रात्री उशिरा शोध कार्य थांबवण्यात आलं होतं. रात्री उशिरा पर्यंत दोन मुले सापडली नाहीत त्यामुळे एन डी आर एफ ची टीमपथकाला पाचारण करण्यात आलं आहे. चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथेफिरण्यासाठी आली होती. त्यामध्ये इब्राहिम काजोरकर गोवळकोट,अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट,फरहान हिदायत पिलपिलेखाटीकअली चिपळूण, अली नियाज सनगे रा बेबल मोहल्ला, जहिद हनीफ खान रा कोंढे चिपळूण, आरमान अजीज खान रा भेंडीनाका चिपळूण, आतीक इरफान बेबल रा बेबल मोहल्ला,( बेपत्ता ), अब्दुल कादीर नोशाद लासने रा.जिव्हाळा सुपर बाझार यांचासमावेश होता. शिरगाव येथील वझर याठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले यावेळी पावसाची एक मोठी सर आली आणि त्यातील सहाजण एका झोपडी खाली जाऊन थांबले तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली सदरचा डोह हा ३० ते ४०फूट खोल असून त्याच्या डोहात सापडल्यावर कोणीही वाचत नाही त्यामुळे सदरची दोन मुले त्यात बुडाली असावी असा प्राथमिकअंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली तरचिपळूण डी वाय एस पी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पाण्याचा डोह हा खूप खोल आहे व पाण्याचाप्रवाह मोठा असल्याने एनडीआरएफच्या पथक बोलावण्यात आलं आहे. करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायत मार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली. आतीक बेबल आणि अब्दुलकादिर लसणे दोघेही इयत्ता दहावीत शिक्षण घेत होते. सदरच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूण मधील अनेक बांधवांनी शिरगावपोलीस ठाण्यात भेट दिली अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत….
No More Posts Available.
No more pages to load.