खेड : तक्रार आणि महिलेच्या जबाबानंतर प्रकरण पलटलं, अत्ताउल्ला तिसेकर यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल

Screenshot

banner 468x60

खेडमध्ये घडलेल्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. किरण तायडे यांच्या तक्रारीनंतर खेड पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 25 जणांवर गुन्हा दाखल केलं आहे.

गैरकायदा जमाव करून किरण तायडे यांना मारहाण केल्याप्रकरणी अत्ताउल्ला तिसेकर यांच्यासह 25 जणांवर खेड पोलीस स्थानकात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

यामध्ये महिलांचाही समावेश आहे.याबाबत किरण तायडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.किरण तायडे हे स्वत: च्या आधारकार्ड केंद्रात कामासाठी आले होते असं त्यांनी म्हटलं आहे. सदर महिला कामानिमित्त कार्यालयात आली होती.

सायंकाळच्या सुमारास शटर बंद करत दोघेजण आतमध्ये आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचा गैरसमज करत किरण तायडे यांच्यासह महिलेला समाजातील नातेवाईक आणि नागरिकांनी कार्यालयातच कोंडून ठेवले.

पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर किरण तायडे यांना पोलीस स्थानकात नेत असताना जमावाने बेदम मारहाण केली होती.या मारहाणीदरम्यान, किरण तायडे यांचे कपडे देखील फाडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 25 हून अधिक जणांनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार अत्ताउल्ला तिसेकर यांच्यासह 25 जणांवर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांकडून मारहाणकर्त्यांचा शोध घेण्यात येत असून यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत. या प्रकरणातील महिलेचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. मारहाणकर्त्यांवर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *