रक्तदान हे सर्वांत श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाही
आहे.

रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदानही देत असतो, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते, त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन
दापोली तालुक्यातील हर्णे गावामध्ये मेमन समाज हॉल मेमन कॉलनी या ठिकाणी 15 ऑगस्ट निमित्ताने रक्तदान शिबिरांच आयोजन करण्यात आलं होतं. दापोली तालुक्यातील हर्णै येथे
मेमन समाजाने 15 ऑगस्ट निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला.


रक्तदान शिबिर संतोष अबगुल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त कार्याने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आला. सुमारे 80 लोकांने रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला होता 65 बाटल्या रक्ताच्या डोनेट करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रेसिडेंट कासम मेमन व्हाईस प्रेसिडेंट आरफात मेमन आणि अनाफ मेमन अरमान अकबानी, नाईम आकबानी यांनी केले होते . इतर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















