गुहागर : बायपास मार्गालगत ब्लास्टिंग, नागरिकांच्या घरावर पडले दगड

Screenshot

banner 468x60

गुहागर बायपास मार्गावर उक्ताडनजीक ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी ठेकेदाराने विनापरवाना ब्लास्टिंग केले आहे. सुरुंग लावल्याने त्याचे दगड उक्ताड कानसेवाडी भागातील घरांवर पडल्याने येथील नागरिक थेट बायपास मार्गावरील सुरुंग लावलेल्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी संबंधित ठेकेदारास रोखले. यावेळी संबंधित ठेकेदाराकडे सुरुंग लावण्याची कोणतीच परवानगी नसल्याचे समोर आले आहे. शहरात सध्या ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे.

banner 728x90

गुहागर बायपास रस्त्याच्या साईडपट्टीलगत या पाणी योजनेचे पाईप टाकण्यात येत आहेत. त्यासाठी चर खोदण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी कातळ लागल्याने संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी ब्रेकरचा वापर करण्याऐवजी थेट ब्लास्टींग केले आहे. गेले तीन-चार दिवस या भागात सुरुंग लावण्यात येत आहेत. मात्र, आज दुपारी या ठिकाणी सुरूंग लावल्यानंतर काही दगड उडून उक्ताड कानसेवाडीतील मंगेश भोसले, रसिक भोसले, चव्हाण यांच्या घरावर दगड पडले.

यामुळे येथील नागरिक थेट बायपास रस्त्यावर आले व संबंधित ठेकेदारास धारेवर धरले. परवानगी नसताना ब्लास्टींग लावण्यात कुणी सांगितले? असा जाब विचारला. यावेळी संबंधित ठेकेदाराने यापुढे ब्लास्टिंग करणार नाही असे आश्वासन दिले. पाणी योजनेची पाईपलाईन टाकणाऱ्या संबंधित ठेकेदाराला नगर परिषदेने खोदाईसाठी ब्लास्टिंगची कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र, तरीही ब्लास्टिंग झाल्याची दखल घेत तत्काळ संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. आता संबंधित ठेकेदाराकडून, पुन्हा अशाप्रकारचे ब्लास्टिंग होणार नाही असे कबूल केल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित खाडे यांनी सांगितले आहे.
गुहागर बायपास रस्त्याच्या साईडपट्टीलगत या पाणी योजनेचे पाईप टाकण्यात येत आहेत. त्यासाठी चर खोदण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी कातळ लागल्याने संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी ब्रेकरचा वापर करण्याऐवजी थेट ब्लास्टींग केले आहे. गेले तीन-चार दिवस या भागात सुरुंग लावण्यात येत आहेत. मात्र, आज दुपारी या ठिकाणी सुरूंग लावल्यानंतर काही दगड उडून उक्ताड कानसेवाडीतील मंगेश भोसले, रसिक भोसले, चव्हाण यांच्या घरावर दगड पडले. यामुळे येथील नागरिक थेट बायपास रस्त्यावर आले व संबंधित ठेकेदारास धारेवर धरले. परवानगी नसताना ब्लास्टींग लावण्यात कुणी सांगितले? असा जाब विचारला. यावेळी संबंधित ठेकेदाराने यापुढे ब्लास्टिंग करणार नाही असे आश्वासन दिले. पाणी योजनेची पाईपलाईन टाकणाऱ्या संबंधित ठेकेदाराला नगर परिषदेने खोदाईसाठी ब्लास्टिंगची कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र, तरीही ब्लास्टिंग झाल्याची दखल घेत तत्काळ संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. आता संबंधित ठेकेदाराकडून, पुन्हा अशाप्रकारचे ब्लास्टिंग होणार नाही असे कबूल केल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित खाडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *