खेड भरणे मार्गावर अचानक जनावरांमुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

जखमी दुचाकीस्वारास हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कृष्णा चव्हाण (70, रा. सुकिवली-खेड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
ते आपल्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.04/इ.एन. 4857) घेवून भरणे येथून खेडच्या दिशेने येत होते. अचानक मोकाट जनावरे रस्त्यात आडवी आल्याने दुचाकी घसरून ते गटारात कोसळले. अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















