गुहागर :​सडे जांभारी येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न;भातगाव केंद्राने मारली बाजी

banner 468x60

गुहागर :​​ सचिन कुळये – गुहागर तालुक्यातील सडे जांभारी येथे २२ व २३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बीटस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या.

banner 728x90

या स्पर्धेत आबलोली बीटमधील कोतळूक, शीर, आबलोली, भातगाव, पाचेरी व पडवे या केंद्रांतील शाळांनी सहभाग नोंदवला होता.

सडे जांभारी गावच्या इतिहासात प्रथमच जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सडे जांभारी नं. २ या शाळेने बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी यजमानपद भूषवले.

सडे जांभारीच्या सरपंच वनिता पांडुरंग डिंगणकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि क्रीडाज्योत प्रज्वलन करून स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

यावेळी काताळे लोहारवाडी येथील ग्रामस्थांनी स्पर्धेसाठी जागा उपलब्ध करून दिली.​याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी खेळाचे महत्त्व, शिस्त आणि संघभावना यावर मार्गदर्शन केले.

विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी केलेल्या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली.​दोन दिवस चाललेल्या या चुरशीच्या स्पर्धेत भातगाव केंद्राने आपले वर्चस्व सिद्ध केले.

लहान व मोठा गट अशा दोन्ही विभागांत मुले आणि मुलींच्या गटात भातगाव केंद्राने प्रथम क्रमांक पटकावत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले.​

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत मोलाचा ठरला गावातील महिला वर्ग व ग्रामस्थांनी दोन दिवस खेळाडू आणि पाहुण्यांसाठी उत्कृष्ट जेवण व्यवस्था केली.​सडे जांभारी येथील देणगीदारांनी आर्थिक व वस्तूरूपात मोलाची मदत केली.​

सत्य सेवा मातोश्री ग्रुप: या मंडळाकडून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ‘ड्रेस कोड’ म्हणून जर्सी-टीशर्ट आणि पंचांना टोप्यांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *