रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना दुर्दैवी अपघात झालाय.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर १५ गणेशभक्त जखमी झाले आहेत. अपघातात १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी व टेम्पो चालकाचा मृत्यू झालाय. विसर्जन मिरवणुकीत नाचणारे १५ भाविक जखमी झाले आहेत.
कोमल नारायण भुवड (वय १७) आणि दीपक लक्ष्मण भुवड (वय ४८) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. अपघातात मृत्यू झालेले हे दोघेजण व जखमी झालेले गणेशभक्त हे सगळे पाचेरी आगर येथील भुवडवाडी येथे राहणारे आहेत.
गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. दुर्दैवाने विसर्जन मिरवणूक सुरू असताना टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो उताराच्या दिशेने पुढे जाऊ लागला.
हा प्रकार टेम्पो ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पो मधून उडी मारून टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्या ड्रायव्हरच्या अंगावरून टेम्पो गेला. तसेच समोर नाचत असलेल्या भाविकांना या टेम्पोची जोरदार धडक बसली.
या दुर्दैवी घटनेत टेम्पोमध्ये बसलेल्या १७ वर्षीय मुलीच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यामधील जखमी झालेला चालक दीपक याला जवळच्या आबलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक उपचाराकरिता त्याला डेरवण येथे नेण्यात येत होते. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
या सगळ्या घटनेचे वृत्त कळताच गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड याही थोड्या वेळात गुहागर येथे दाखल होणार आहेत.
सदर अपघाताचे वृत्त कळताच गुहागर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाठपोठ चिपळुण, गुहागरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने देखील घटनास्थळी पोचले. आबलोली व पाचेरी आगर येथील घटनास्थळी पोलीसांकडून पुढील प्रक्रिया सुरु आहे. Accident in Ganesh immersion procession

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*