चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था या शिक्षण क्षेत्रात अग्रेसर संस्थेच्या कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध शेखर निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माजी खासदार, शिक्षण महर्षी व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते गोविंदराव निकम यांनी या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या संस्थेने आज वटवृक्षाचे रूप धारण केले असून नर्सरीपासून नर्सिंग, आयटीआय ते अभियांत्रिकीपर्यंत विविध शाखांमध्ये उल्लेखनीय विस्तार साधला आहे.
संस्थेची भक्कम पायाभरणी गोविंदराव निकम आणि अनुराधा निकम यांनी केली. त्यानंतर शेखर निकम यांनी कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत संस्थेच्या प्रगतीला गती दिली. सध्या ते आमदार म्हणून कार्यरत आहेत.
आता नव्या पिढीकडे नेतृत्वाची धुरा सोपवित अनिरुद्ध शेखर निकम यांच्या रूपाने संस्थेला नवे नेतृत्व मिळाले आहे. त्यांनी कृषी विषयात ऑस्ट्रेलियातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून ते उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













