आंजर्ले : अडखळ येथे 25 ब्रास विनापरवाना वाळूचा साठा, दोघांविरोधात गुन्हा

banner 468x60

आंजर्ले खाडीकिनारी असलेल्या अडखळ येथे विनापरवाना 25 ब्रास वाळूचा साठा केल्याप्रकरणी दोघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्णे येथील मंडळ अधिकारी विनोद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी महसूल विभागाच्या पथकाला आंजर्ले खाडीकिनारी बेकायदा वाळू उपसून विक्री केल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता दोन प्लॉटवर अनुक्रमे 5 व 20 ब्रास वाळू साठवलेली आढळली.


वाळू साठवणाऱ्यांकडे रॉयल्टीची परवानगीपत्रे मागितली असता ती नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फैयाज महमूद खाचे आणि सैयाज मैनूद्दीन काझी (दोघेही रा. अडखळ) यांच्याविरोधात वाळू चोरी आणि खाण व खनिज (नियमन व विकास) अधिनियम, 1957 चे कलम 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सडकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *