स्चिपळूण : प्रिंग क्लिनिकमध्ये अ‍ॅलर्जी क्लिनिक – नवीन सेवेचा शुभारंभ

banner 468x60

सततची सर्दी, शिंका, खोकला, त्वचेवर पुरळ, डोळे लाल होणे, श्वास घेण्यास त्रास होणे तसेच दमा यांसारख्या अ‍ॅलर्जीच्या त्रासामुळे त्रस्त असलेल्या कोकणातील नागरिकांसाठी चिपळूण येथील सुप्रसिद्ध स्प्रिंग स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्ययावत अ‍ॅलर्जी टेस्टिंग व इम्युनोथेरपी उपचार सुविधेचा प्रारंभ करण्यात आला आहे.

banner 728x90

या नव्याने सुरू झालेल्या अ‍ॅलर्जी क्लिनिकमध्ये हवेतील तसेच आहारातून होणाऱ्या अ‍ॅलर्जेनची अचूक ओळख करण्यासाठी अत्याधुनिक अ‍ॅलर्जी टेस्टिंग सुविधा उपलब्ध असून, योग्य निदानानंतर इम्युनोथेरपीद्वारे दीर्घकाळापासून असलेल्या जुनाट अ‍ॅलर्जीवरही प्रभावी नियंत्रण मिळवता येणार आहे. त्यामुळे वारंवार औषधांवर अवलंबून राहावे लागणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा विशेष लाभदायक ठरणार आहे.

अ‍ॅलर्जीमुळे होणारे त्वचारोग, सततची सर्दी, नाक बंद होणे, श्वसनाचे विकार व दमा यामुळे ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी स्प्रिंग क्लिनिकचे हे नवीन सेवादालन मोठे वरदान ठरणार आहे. या अ‍ॅलर्जी क्लिनिकमध्ये तज्ञ व अनुभवी त्वचारोगतज्ञ डॉ. यतीन जाधव तसेच ज्येष्ठ फिजिशियन व श्वसन विकारतज्ञ डॉ. शशिकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

त्वचारोग व अ‍ॅलर्जी उपचार क्षेत्रात जागतिक दर्जाच्या नवनवीन सुविधा कोकणवासीयांना कोकणातच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न स्प्रिंग क्लिनिकने नेहमीच केला आहे. या नव्या अ‍ॅलर्जी क्लिनिकमुळे स्प्रिंग क्लिनिकच्या या लौकिकात आणखी भर पडणार असून, कोकणातील नागरिकांना आता मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही.

स्प्रिंग अ‍ॅलर्जी क्लिनिकची सेवा चिपळूण व खेर्डी या दोन्ही ठिकाणी उपलब्ध असणार आहे. अ‍ॅलर्जी तपासणी व उपचार सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन स्प्रिंग क्लिनिकतर्फे करण्यात आले आहे.

📞 संपर्क क्रमांक :
9730906216
7998494949
(02355) 261246
(02355) 260677

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *