चिपळूण : अपरांत हॉस्पिटल द्वारे कान, नाक, घसा आणि सायनस तपासणी शिबिराचे आयोजन

banner 468x60

दिनांक 31ऑगस्ट रोजी अपरांत हॉस्पिटल द्वारे कान नाक घसा व सायनस मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

banner 728x90

अपरांत हॉस्पिटल ने गेल्या 5 वर्षापासून रुग्णसेवेसोबतच विविध सामाजिक व लोकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. अपरांत हॉस्पिटलने एप्रिल महिन्यामध्ये ई ए एन टी डिपार्टमेंट द्वारे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते*.

या कार्यशाळेला नागरीक व डॉक्टर्स यांचे मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.*या उपक्रमामध्ये दहा रुग्णांवर एन्डोस्कोपिक सायनस सर्जरी करण्यात आली.

अपरांत हॉस्पिटल मधील अद्ययावत सुविधा आणि KEM हॉस्पिटलचे ई एन टी विभाग प्रमुख डॉक्टर मिलिंद नवलाखे यांचे द्वारे रुग्णावर शस्त्रक्रिया केल्या गेल्या.

या रुग्णाभिमुख सेवेची नागरिकांना असलेले गरज लक्षात घेता अपरांत हॉस्पिटलने विविध ठिकाणी मोफत शिबिरांचे आयोजन केले आहे.

अपरांत हॉस्पिटलचे डायरेक्टर व इ एन टी विभाग प्रमुख अनुभवी ज्येष्ठ सर्जन डॉक्टर यशवंत देशमुख यांचे द्वारे या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे*. सतत नाक वाहणे, वारंवार सर्दी होणे, फक्त रात्री खोकला येणे, सतत थकवा जाणवणे, नाकावाटे श्वास घेण्यास अडथळा होणे, घसा खवखवणे यासारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी हे शिबिर उपयोगी ठरणार आहे. शिबिरार्थींना ऑडिओमेट्री, सिटीस्कॅन, रक्त तपासणी यासारख्या निदान चाचण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

बिना टाक्यांची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अतिप्रगत साधने, निपुण व नामांकित डॉक्टर, मोफत तपासणी,माफक दर, शिबिराचे आयोजना मागील सामाजिक सद्भावना, व रुग्णांची गरज अशा विविध पैलू ने हे शिबिर वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी *7998898989**7998737373* *8767101271* या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अपरांत हॉस्पिटल प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *