दापोली : वाकवली येथे रिक्षाच्या धडकेत बिबट्याचा बछडा जखमी

दापोली : वाकवली येथे रिक्षाच्या धडकेत बिबट्याचा बछडा जखमी

banner 468x60

दापोली येथील वाकवली येथे रिक्षाची धडक लागून बिबट्याचा बछडा जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आल्याची माहिती दापोली वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली.

शुक्रवारी (ता. ३० ऑगस्ट) रात्री दहाच्या सुमारास वाकवली वसतिगृह येथे गिरीधर येलकर यांच्या रिक्षा टेम्पोच्या धडकेने बिबट्याचा बछडा जखमी झाला आहे. त्यानंतर बछडा जागीच बसून असल्याची माहिती वाइल्ड अ‍ॅनिमल रेस्क्यू टीमचे मिलिंद गोरिवले यांनी दिली.

तत्काळ वाइल्ड अ‍ॅनिमल रेस्क्यू टीमने पाहणी केली असता बछडा जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला बसल्याचे दिसले. परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांच्या सहकार्यातून त्याला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले.

पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले. परिक्षेत्र वनाधिकारी पाटील, वनपाल सावंत, वनरक्षक जळणे, वनरक्षक जगताप, वनरक्षक गुरव, वनरक्षक भिलारे व वाइल्ड अ‍ॅनिमल रेस्क्यू टीमचे तुषार महाडिक, मिलिंद गोरिवले, मयूर चव्हाण, अनिकेत जाधव यांनी यासाठी मदत केली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *