खेड : भोस्ते घाटातील अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल

banner 468x60

खेडमधील मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाट उतरत असतानाच गतीरोधकाजवळ तीन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघाता प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

राजेश्वर शनप्पा मंगलगी (वय-२६, रा. गुब्बेवाड, ता. सिंदगी, जि. बिजापूर, राज्य – कर्नाटक) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे.

हा अपघात . २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:४५ वाजताच्या दरम्यान घडला होता. जागृती सुर्वे., शोभा सदानंद कदम., संस्कृती संतोष कदम व मयुरेश कदम (सर्व रा. वृंदावन सोसायटी, ठाणे- पश्चिम., मूळ रा. कोकरे – वाघशिबीवाडी., ता. चिपळूण., जि. रत्नागिरी) अशी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.

कारचालक वैभव शिवाजी सुर्वे (४०, वृंदावन सोसायरी ठाणे- पश्चिम, मूळ रा. कोकरे – वाघशिबीवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी तक्रार दाखल केली त्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *