गुहागर : मला कामाचा त्रास होतोय, “मी आत्महत्या करतोय” व्हॉटसअपवरील मेसेजने सस्पेन्स वाढवला

banner 468x60

गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील पोस्टमास्तर आपल्या ऑफिसच्या व्हाट्सअप ग्रुप वर मी आत्महत्या करतोय असा मेसेज टाकल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली.

banner 728x90

हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अखेर रत्नागिरीचे डाकअधीक्षक अनंत सारंगळे यांनी याप्रकरणी संघटना प्रतिनिधीं यांच्याशी चर्चा करून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर संबंधित पोस्टमास्तरची विचारपूस करून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.


गुहागर तालुका अतिशय दुर्गम भागात विभागलेला भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील खाडीकिनारील अनेक गावांमध्ये पोस्टमास्तर आणि पोस्टमन अशी दोन कर्मचारी हे गावामध्ये सेवा देत असतात मात्र गेल्या आठ दिवसापासून गुहागर तालुक्यातील पेवे गावातील पोस्टमन

हा शृंगारतळी येतील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या मर्जीतील असल्याने त्याला दुसऱ्या ठिकाणी कामगिरीवर काढले मात्र त्याचा फटका बसला तो याच पेवे गावातील 54 वर्षीय पोस्टमास्तरला. सध्या हा 54 वर्षीय पोस्टमास्तर हा गेल्या आठ दिवसापासून आपल्या गावातील पोस्टमास्टर आणि पोस्टमन या दोन्ही पदाची काम करतोय परिणामी कामाचा

ताण येऊन त्याची मानसिक स्थिती ढासळलेली आहे. अशातच त्यांचे शृंगारतळी येथील वरिष्ठ अधिकारी प्रभारी डाकनिरीक्षक हे त्यांना काही महिन्यापासून या पोस्टमास्तरला त्रास देत असल्याचे समजते.

डाकनिरीक्षक यांना पेवे गावचे पोस्टमास्तर यांनी आठ दिवसात अनेक वेळा फोन करून मला या दोन्ही कामाचा लोड जास्त होतोय आणि मला ते करताना खूप मानसिक त्रास होतो. याबाबत सविस्तर सांगितले मात्र तरीही डाक निरीक्षक याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत हे त्यांच्या लक्षात आले.

तसेच आपल्या मर्जीतील पोस्टमनला त्यांनी कामगिरीवर काढल्याने त्यांच्यावर कामाचा जास्त ताण ही आला. अखेर या पेवे गावातील 54 वर्षे पोस्ट मास्तरने ऑफिसच्या सोशल मीडिया ग्रुप वर आपण आत्महत्या करतोय. माझ्याकडे शेवटची पाच मिनिट शिल्लक आहेत. असा मेसेज टाईप केला.

तसेच या मेसेजच्या आधी डाक निरीक्षक प्रमोद पाटील यांना त्यांनी एक फोन कॉलही केला आहे. त्यामध्ये ते सर तुम्ही माझा ऐकून घ्या अन्यथा माझे शेवटचे पाच मिनिट शिल्लक आहेत. मी आत्महत्या करतोय असे फोन करूनही सांगितले मात्र त्याच वेळी निष्ठुर अशा प्रमोद पाटील यांनी तुम्हाला जे काय करायचे ते करा पुन्हा मला फोन करू नका असे सांगून त्यांचा फोन कट केला.

त्यांची अशी पोस्ट सोशल मीडियावर आल्याने त्यांचे सहकारी यांनी तात्काळ पेवे येथे जात आपल्या सहकाऱ्याला याबाबत समजावले तसेच हा विषय आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितला. त्यावेळी सर्व कर्मचारी आणि गावकरी यांनी मिळून संबंधित पोस्ट मास्तरला न्याय मिळवून देण्याचे ठरवले.

त्यात विषयाचे गांभीर्य ओळखून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथील डाक अधीक्षक अनंत सारंगळे यांच्याबरोबर चर्चा करून या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली. अखेर याप्रकरणी चौकशी करून आठ दिवसात अहवाल सादर करण्यात येईल असे संघटना प्रतिनिधींना सांगण्यात

व यामध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात काम करताना अशाप्रकारे एखादा वरिष्ठ अधिकारी जर त्रास देत असेल तर संपर्क करण्याचा आवाहन अनंत सारंगळे यांनी केले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *