रत्नागिरी : बी. ए चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गळफास घेत आत्महत्या केली.

banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटन गुरूवार १३ मार्च रोजी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. अमित गणेश चव्हाण (२२) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

अमित चव्हाण हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात (एसवाय. बी. ए) चे शिक्षण घेत होता. विद्यार्थ्यांना होळी सणाची सुट्टी असल्याने अमित चव्हाण हा बुधवारी रजा अर्ज देऊन वसतिगृहातून बाहेर पडला.

घरी गेलेला अमित दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारच्या सुमारास पुन्हा वसतिगृहामध्ये आला. रूममध्ये आल्यावर त्याने रुमचा दरवाजा लावून घेत त्याने स्वतःला बंद करून घेतले होते. रूम बंद असल्याने इतर विद्यार्थ्यांनी दरवाजा ठोठावत त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र आतमध्ये असलेल्या अमितने कोणताही प्रतिसाद दिला नाही.

विद्यार्थ्यांनी तातडीने घटनेची कल्पना येथील कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर वसतिगृहाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आतप्रवेश केल्यावर त्यांना अमित गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *