खेड : शिमगोत्सवासाठी आणखी 3 होळी स्पेशल

banner 468x60

कोकण मार्गावर शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मडगाव-पनवेल, मडगाव-एलटीटीसह चिपळूण-पनवेल मेमू स्पेशल धावणार आहे.

banner 728x90

तीनही स्पेशलच्या १६ फेऱ्या धावणार असल्याने चाकरमानी सुखावले आहेत.०११०२/०११०१ क्र.ची मडगाव-पनवेल साप्ताहिक स्पेशल १५ व २२ मार्च रोजी धावेल. मडगाव येथून सकाळी ८ वा. सुटून सायं. ५.३० वा. पनवेल येथे पोहचेल.

परतीच्या प्रवासात पनवेल येथून सायंकाळी ६.२० वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ६.४५ वा. मडगाव येथे पोहचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल करमाळी, थिविम, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण स्थानकात थांबेल. ०११०४/०११०३ क्र.च्या मडगाव-एलटीटी साप्ताहिक स्पेशलच्या ४ फेऱ्या धावणार आहेत.

१६ व २३ मार्चला धावणारी स्पेशल मडगाव येथून सायंकाळी ४.३० वा. सुटून पहाटे ६.२५वा. एलटीटीला पोहचेल. परतीच्या प्रवासात १७ व २४ मार्चला धावणारी स्पेशल एलटीटीहून सकाळी ८.२० वा. सुटून रात्री ९.४० वा. मडगाव येथे पोहचेल.

२० एलएचबी डब्यांच्या स्पेशलला करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आरवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवले, ठाणे स्थानकात थांबे देण्यात आले आहेत.

०१०१८/०१०१७ क्र.च्या चिपळूण-पनवेल मेमू स्पेशलच्या १३ ते १६ मार्चदरम्यान ८ फेऱ्या धावणार आहेत. चिपळूण येथून दुपारी ३.२५वा. सुटणारी मेमू स्पेशल रात्री ८.३० वा. पनवेल येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून रात्री ९.१० वा. सुटून मध्यरात्री २ वा. चिपळूण येथे पोहचेल..

स्पेशलला आंजणी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, क सापेवामने, वीर, गोरेगाव, माणगाव, ४ इंदापूर, कोलाड, रोहा, पेण स्थानकात थांबे देण्यात आले आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *