कोकण रेल्वे वरील या तीन गाड्या दादर पर्यंत जाणार

banner 468x60

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने याचा परिणाम कोकणातून येणाऱ्या तीन गाड्यांवर होणार आहे.

banner 728x90

कोकणातून सीएसएमटीपर्यंत धावणाऱ्या या गाड्या २८ फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. यामुळे प्रवाशांना दादरपासून पुढील प्रवासाकरिता अन्य रेल्वे व इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. गत वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाट क्रमांकाच्या विस्तारीकरणाची कामे सुरू आहेत.

सद्यस्थितीमध्ये फलाट क्रमांक १२ व १३चे काम कोकण रेल्वेने हाती घेतले आहे. या कामांमुळे कोकणातून सीएसएमटीपर्यंत धावणाऱ्या गाड्यांच्या अंतिम स्थानकांमध्ये बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार गाडी क्रमांक १२१३४ मंगळूर एक्स्प्रेस ही गाडी ठाण्यापर्यंत धावणार आहे, तर गाडी क्रमांक १२१२० मडगाव सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस या दोन गाड्या दादरपर्यंत चालवून अंशतः रद्द केल्या जाणार आहेत.

त्यामुळे कोकणातून सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना अंतिम स्थानक म्हणून दादर येथे उतरावे लागणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *