दापोली तालुक्यातील हर्णे येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवा खुर्द येथील धनश्री वाडकर यांच्या मोबाईलसह सुमारे 13,200 रुपयांचा ऐवज चोरटयाने लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली.
चोरट्याने पर्यटकांच्या गाडीत खिडकीतून शिरून हा ऐवज लांबवला. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री वाडकर या बुधवारी सकाळी मासे खरेदीसाठी हर्णे बंदरात आल्या होत्या.
त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही होते. हे सर्वजण पांढऱ्या रंगाच्या टेम्पो ट्रव्हलरमधून तेथे गेले होते. मासे खरेदी करण्यासाठी हर्णे बंदर येथे गाडी उभी करून सर्वजण मासे खरेदीला खाली उतरले होते.
त्यावेळी चोरटयाने गाडीच्या खिडकीतून गाडीत प्रवेश करत गाडीत असणारा वाडकर यां सुमारे 8 हजार रुपये केंमतीचा काळ्या रंगाचा रेडमी कंपनीचा मोबाईल आणि 5,200 रुपयांची रोख रक्कम लंपास केली.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार सडकर करीत आहेत.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*