दापोली : सुकी मिरची आली विक्रीला, दर कमी असल्याने ग्राहकांची गर्दी मात्र ˈक्वॉलटीबाबत’ प्रश्नचिन्ह

banner 468x60

दापोलीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सुकी मिरची विक्रीसाठी आणली आहे. दुकानांमधील मिरची विक्री दराच्या मानाने पर प्रांतीयांनी दापोलीत विक्रीसाठी आणलेली मिरची ग्राहकांना स्वस्त वाटत असल्याने मिरची खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

दापोली शहर हे तालुक्याचे ठिकाण असले तरी दापोली ही एक मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक येथे विविध प्रकारचे सामान खरेदीसाठी नेहमीच येत असतात. त्यामुळे दापोलीत दररोज मोठी आर्थिक उलाढाल होते. दापोलीत पर प्रांतिय व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुकी मिरची विक्रीसाठी आणली असून दापोलीतील स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानातील मिरची विक्री दरापेक्षा पर प्रांतीयांनी येथे विक्रीसाठी आणलेली मिरची ही स्वस्त असल्याने स्वस्त म्हणून लोक मोठ्या प्रमाणात मिरची विकत घेत आहेत.

त्यांच्या वजन काटयातही तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. मिरची कांडप करून मसाला करून झाल्यावर पुढे तो कलरहीन पांढरा सटफटीत होतो. मसाल्यातील तिखटपणा ही उतरतो मात्र दरम्यानच्या काळात पर प्रांतीय मिरची विक्रेते हे येथून निघून गेलेले असतात मग जाब विचारायचा कोणाला हा प्रश्न मिरची खरेदी केलेल्या ग्राहकांना पडतो.

याउलट स्थानिक दुकानात घेतलेल्या मिरची बाबत असा काही प्रकार घडलाच तर त्याला जाब विचारता येतो. असे असतानाही सध्या पर प्रांतीय मिरची विक्रेत्यांच्याकडून मिरची खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे.

पर प्रांतीय मिरची विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या संकेश्वरी 190 रुपये, काश्मीर बॅडगी 200 रुपये, गुंठूर आंध्रा 180 रुपये या प्रमाणे प्रती किलोचे दर आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *