दापोली : विधानसभेसाठी मनसेचे संतोष अबगुल उमेदवारी अर्ज दाखल करणार

banner 468x60

मंडणगड – खेड – दापोली विधानसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून संतोष अबगुल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

संतोष अबगुल आपला उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी दाखल करणार आहेत. अबगुल यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर आणि मनसैनिकांनी आभार मानले आहेत.

उमेदवार संतोष अबगुल हे दापोली येथील गोपाळकृष्ण सोहनी शाळेमध्ये संतोष अबगुल प्रतिष्ठानतर्फे रक्तदान करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

तरी जास्तीत जास्त दापोलीतील जनतेने रक्तदान करून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *