रत्नागिरी जिल्ह्यात सध्या महिला आत्याचाराच्या घटना समोर येत असताना एका चांगल्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींकडूनही अश्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे रत्नागिरी पंचायत समितीमधील एक शिक्षण विस्तार अधिकारी वादात सापडला आहे.
शाळा भेटीदरम्यान या विस्तार अधिकार्याने एका मुख्याध्यापक महिलेला अपमानास्पद, मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
याबाबत या महिलेने जिल्हा परिषदेकडे धाव घेतली असून, रितसर तक्रार केली आहे.
सध्या राज्यात महिलांवर होणार्या अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. याबाबत शासनही गंभीर झाले असून विविध उपक्रम राबवले जात आहेत.
विशेषतः शाळांमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, महिला समित्या स्थापन केल्या जात आहेत. परंतु हे अत्याचार कमी होण्याचे नावच घेईना.
दिवसागणिक यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील एका शाळेत तसेच आता काही दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यात एका शाळेतील मुलींबाबत गैरवर्तन झाले होते. याबाबत पोलीस स्थानकात रितसर तक्रार करण्यात आली होती. आता मात्र शाळेतील शिक्षिकाही सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील एका शाळेत मुख्याध्यापिकेला या गैरवर्तनाला सामोरे जावे लागले आहे. एका शिक्षण विस्तार अधिकार्यानेच अपमानकारक व मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप या महिला मुख्याध्यापिकेने केला आहे.
याबाबत तिने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्याकडे रितसर तक्रार केली आहे. या गैरवर्तनामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो, असे या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत आता चौकशी सुरु झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. यामुळे आता या विस्तार अधिकार्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













