रत्नागिरी : लाडक्या बहिणींनो आज अकाउंट चेक करा, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे आज जमा होणार

banner 468x60

शासनाकडून महिलांना कोणतीही मदत अथवा सानुग्रह अनुदान दिले जात नाही. कुटुंबाचे आर्थिक नियोजन सांभाळणाऱ्या, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बहिणींना शासनाकडून बक्षीस दिले जात आहे.

banner 728x90

काही दिवसातच आचारसंहिता लागेल त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे येत्या ९ तारखेलाच खात्यावर जमा होतील, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत साेमवारी शहरातील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे महिला सशक्तीकरण व सक्षमीकरण मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी मंत्री सामंत बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी श्रीकांत हावळे, मुख्याधिकारी तुषार बाबर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव उपस्थित होते.
मंत्री सामंत पुढे म्हणाले की, विरोधक ही योजना बंद होण्यासाठी

उच्च न्यायालय, सर्वाेच्च न्यायालयात गेले परंतु दोन्ही ठिकाणी आमच्या बाजूने निकाल लागला. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांना धडा शिकवण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी

बहीण योजना महिलांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, सीआरपी, महिला व बाल कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मंत्री सामंत यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *