गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभवी विनोद जानवळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत जानवळे येथे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी विखारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी सरपंच जान्हवी विखारे, ग्रामपंचायत सदस्य प्रसन्न पाटील, मंगेश कोंडविलकर,विभावरी लांजेकर, विजया शितप, रमेश नर्बेकर, प्रशांत शिरगावकर, अंतिम संसारे, विजय शिंदे,
माजी उपसरपंच मुबीन ठाकूर,मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, मनसे शेतकरी सेना गुहागर तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, मनसे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी,
गणेश तांबे, महेश जाधव, भरत विखारे, संदीप कोंडविलकर, महेश तांबे, विजय बैकर, प्रसाद संसारे, ओंकार संसारे, प्रसाद पवार उर्फ दादू, सचिन कोळंबेकर, प्रमोद शिरगावकर, राजू बेलवळकर, परशुराम रहाटे, गणेश तांबे, सुशांत कोळंबेकर, मनसे मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी, मनसे उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, मनसे काळसूर-कौढर शाखाध्यक्ष सुनील मुकनाक, मानसी कोंडविलकर, वैष्णवी जानवळकर,विजय लांजेकर, नितीन कारेकर, किशोर बामणे,गणेश जानवळकर,शर्मिला जानवळकर,ग्रामपंचायत अधिकारी जी. बी . सोनवणे, लिपिक संजय भगवे, गणेश शिरगावकर आदी. मान्यवर उपस्थित होते.
उपसरपंच वैभवी जानवळकर यांच्या उपसरपंच निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालय ते श्री. साई मंदिर, श्रृंगारतळी बाजारपेठ तसेच संपूर्ण गावात त्यानंतर त्यांच्या निवासस्थानापर्यंत ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिषबाजित भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान गावातील नागरिकांनी स्वागत व सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर,जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी, त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व मनसे सैनिक महिला आघाडी व जानवळे गावातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*