मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड तालुक्यातील उधळे गांवचे सुपुत्र, दुबईस्थित प्रसिद्ध उद्योजक बशीरभाई हजवाणी यांना नुकतेच ‘इन्कलाब आयकॉनिक अचिव्हर्स 2024 ’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने इस्लाम जिमखाना मुंबई येथे सोसायटी अँड नेशन बिल्डिंगमध्ये सन्मानित करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अलहमदुल्लाह समुदायातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व जेएमबीआर ग्रुप्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि हजवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष बशीर म.हजवानी हे त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी, त्यांच्या औदार्याने आणि समाजातील उन्नतीसाठी प्रसिद्ध आहेत.

ते दुबईस्थित प्रसिद्ध उद्योजक असून ते आपल्या कोकणातील विशेषतः खेड तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. एवढेच नव्हे तर तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करून उद्योगाकडे वळावे, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असून ते तरुणांना तशा पद्धतीचे मार्गदर्शनही करत आहेत.

ते आपल्या खेड तालुक्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असून विविध संस्थांवर ते प्रमुख जबाबदारीच्या पदावर कार्यरत राहून मोठ्या कौशल्याने व हिकमतीने या संस्थाना मानमरातब मिळवून देत आहेत.
त्यामुळे आपल्या या कार्याने ते खर्या अर्थाने आयकॉनिक ठरले आहेत. त्यामुळेच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना शुक्रवार दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी इस्लाम जिमखाना मुंबई येथे सोसायटी अँड नेशन बिल्डिंगमध्ये इन्कलाब आयकॉनिक अचिव्हर्स अवॉर्ड 2024 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संपूर्ण कोकणासह खेड तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











