दापोली : उंबर्ले लाटीमाळ जवळ बिबट्याचा वावर

banner 468x60

दापोली दाभोळ मार्गावरील महत्त्वाचे गाव असलेल्या उंबर्ले पंचक्रोशीतील तेरेवायंगणी गावाकडे जाणाऱ्या परिसरात आठवड्याभरापासून बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे.

banner 728x90

दिवसाढवळ्या परिसरात संचार करणाऱ्या बिबट्यांमुळे उंबर्ले, नानटे, तेरेवायंगणी येथील लोकांना शेतीच्या कामासाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे.

बिबट्याच्या संचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा संचार वाढल्याने वन विभागाने योग्य खबरदारी घेत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

दापोली तालुक्यातील उंबर्लेतील लाटीमाल येथूनच तेरेवायंगणी या गावाकडे जाणारा मार्ग आहे. याच मार्गावरून पन्हाळेकाजी लेण्यांकडे गावराईहून जाण्यासाठीचा मार्ग आहे.

त्यामुळे या मार्गावर स्थानिकांची वर्दळ असतेच. तसेच अनेक पर्यटकही याच मार्गाने पन्हाळेकाजी लेण्या पाहण्यासाठी जातात. अशा या ठिकाणी बिबट्याचा संचार वाढला आहे.

त्यामुळे उंबर्ले गावासह तेरेवायंगणी, नानटे, माथेगुजर , ओळगाव , निगडे ,वळणे या गावातील लोकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *