दाभोळ : फक्त दाभोळ, कोकण नाही तर दुबई, कुवेत, कतार सौदी अरेबियातील प्रेक्षकांनी बोगस ठेकेदाराची पोलखोल केल्यानंतर कोकण कट्टा न्यूजचं केलं अभिनंदन संपादक तेजस बोरघरे यांच्या पत्रकारितेचं केलं कौतूक

तेजस बोरघरे, संपादक, कोकण कट्टा न्यूज

banner 468x60

आतापर्यंत कोकण कट्टा न्यूजने कोकणातील अनेक बातम्यांना वाचा फोडली आहे. सामाजिक भूमिका घेऊन कोकण कट्टा न्यूजने वेळोवेळी आवाज उठवला आहे. मुळात आमच ब्रीदवाक्य हेच आहे.

वेगवान बातमी | अचूक आणि थेट भूमिका हेच ब्रीदवाक्य समोर ठेऊन आमची सर्व सहकारी काम करत आहे. कोकणातील अनेक स्थानिक प्रश्न आणि जनतेला न्याय देणारं व्यासपीठ म्हणून कोकण कट्टाची ओळख आहे.

आम्ही केलेल्या अनेक बातम्यांचा इम्पॅक्ट झाला आहे. आम्ही नेहमी सामाजिक भूमिका घेऊन ही पत्रकारिता सुरू केलीय. आम्ही सामाजिक बातम्या आणि जनहिताच्या बातम्या आणि सामन्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत .

जनहिताच्या बातम्यांना आम्ही प्राधन्य देतो . समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन कोकण कट्टा न्युज एक आवाज बनला आहे.

अलीकडेच कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांनी दाभोळमधील मुजोर ठेकेदार योगेश सुर्वेची पोलखोल केली आहे.

दाभोळमधील नागरिकांचं जे मत होतं ते संपादक तेजस बोरघरेनी मांडल आणि हे दाभोळमधील सर्वच नागरिकाना पटलेलं आहे.

कोकण कट्टा न्यूजचे वाचक आणि प्रेषक फक्त कोकणात नाहीत तर सातासमुद्रापार आहेत. दाभोळ, कोकणासोबत दुबई, कुवेत, सौदी अरेबिया, कतार मधील प्रेक्षकांनी बोगस ठेकेदाराची पोलखोल केल्यानंतर कोकण कट्टा न्यूजचं अभिनंदन केलं आहे .

संपादक तेजस बोरघरे यांच्या पत्रकारितेचं कौतूक केलं आहे. अनेक प्रतिक्रिया कोकण कट्टा न्यूजच्या यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप आणि वेबसाईटवर आले आहेत. वाचक आणि प्रेषक यांचा वाढता पाठिंबा पाहून आम्ही अधिक जोमाने काम करू.


आम्ही निप: क्षपणे कोणालाही न घाबरता जी सत्याची भूमिका आहे ती मांडतो. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही एक छोटी सुरुवात आहे.

सत्याला धरुन आमची पत्रकारिता आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील कोकण कट्टा न्यूजच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. मनसे नेते वैभव खेडेकर यांनीही या भूमिकेचं कौतुक केलं आहे.

  • तेजस बोरघरे, संपादक, कोकण कट्टा न्यूज
banner 728x90

Responses (4)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *