चिपळूण बहादूर शेख नाक्यात तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐन गणेशोत्सवात चिपळूण शहर हादरले आहे .बहादूर शेख नाका येथे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला असून मोठी खळबळ उडाली आहे.
बहादूरशेख नाक्याजवळील वांगडे मोहल्ला येथे हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. दुकानाच्या बाहेर तरूणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला आहे. हमीद शेख (वय ४२) असं या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार दोघांना ताब्यात घेण्यात चिपळूण पोलिसांना यश आले आहे.
संशयितांपैकी एक अल्पवयीन असल्याचे समजत आहे. हमीद शेखला दारूचे व्यसन होते. तो एकटाच राहतो. खून झाल्याची माहिती पोलिसांना कळताच डीवायएसपी राजेंद्र कुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे घटनास्थळी दाखल झाले होते.
हा संपूर्ण प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका गजबजलेल्या भाग आहे. ऐन गणेशोत्सवच्या आनंदाच्या काळात चिपळूण शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.
दरम्यान ही हत्या का झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही अधिक माहिती लवकरच पुढे येण्याची शक्यता असून पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*