येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळते. दरम्यान रत्नागिरीतील भाजपने दावा केलेल्या गुहागर मतदासंघाबाबत ट्विस्ट निर्माण झाला आहे.
भास्कर जाधव चिपळुणातून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. चिपळूणमध्ये भास्कर जाधव तर गुहागरमध्ये विक्रांत जाधव उमेदवार असतील अशी चर्चा सध्या मतदारसंघात जोर धरू लागली आहे.
विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून उद्धव सेनेने आतापासूनच उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षाचे सचिव आणि काेकण निरीक्षक मिलिंद नार्वेकर यांनी रत्नागिरी, चिपळूण मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमधून इच्छुक असल्याचे सांगितले आहे.
त्याचबराेबर या मतदारसंघातून रोहन बने आणि राजेंद्र महाडिक हेही इच्छुक आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय बने, प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी आणि राजेंद्र महाडिक हे इच्छुक आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मिलिंद नार्वेकर यांनी रत्नागिरीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पक्षाची राजकीय स्थिती काय आहे,
त्याचबराेबर प्रत्येक तालुक्यात प्रबळ विराेधक काेण आहेत, पक्षासमोरील अडचणी काय आहेत, याची माहितीही त्यांनी जाणून घेतली. तसेच आगामी विधानसभेसाठी पक्षामध्ये इच्छुक कोण आहे, याची चाचपणी केली. रत्नागिरी व चिपळूण मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी चिपळूणमधील विषय हाताळून चिपळूणकडे लक्ष केंद्रित केले हाेते. पक्षाने संधी दिल्यास आपण चिपळूणमधूनही लढू, असे सूतोवाच त्यांनी यापूर्वी केले हाेते. आता तर त्यांनी मुलाखत दिल्याने त्यांनी चिपळुणातून लढण्याची तयारी केल्याचे पुढे आले आहे.आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासाठी माेर्चेबांधणी सुरू केली आहे.
त्यांच्यासाठी गुहागर मतदारसंघ साेडण्याची तयारी भास्कर जाधव यांनी केली आहे. त्यामुळेच त्यांनी चिपळूणमधून लढण्याची तयारी केली आहे. या मतदारसंघातून इच्छुक म्हणून मुलाखतही दिली आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*