लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता आला! ‘इतके’ रुपये झाले जमा

banner 468x60

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिला आणि दुसरा असे एकत्रित दोन हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होत आहेत.

बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली. 3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे.

31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. दरम्यान, अर्ज दाखल केलेल्या २७ लाख महिलांचे खाते आधार कार्डशी लिंक नसल्याचं समोर आलेलं आहे.

त्यामुळे त्या महिला वंचित राहू शकतात. सरकारने अशा लाभार्थ्यांना १७ ऑगस्टपर्यंत खाते लिंक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. १७ तारखेला दोन हफ्ते देणार आहोत. आता आम्ही सुरू करतोय, चेक करतोय पैसे जाताहेत की नाही. आम्ही शब्द दिलाय 17 तारखेला आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे दोन हफ्ते जातील.

लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात झाली आहे. आता तुम्ही विरोधकांना विचारा त्यांच्याकडे काय उत्तर आहे? माझ्या लाडक्या बहिणींना आधीपासून सांगतोय की, या सावत्र भावांपासून सावध राहा.. तुम्हाला पैसे मिळू नयेत म्हणून हायकोर्टात देखील गेले आहेत. त्यांना हायकोर्टाने देखील फटकारले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *