रत्नागिरी : मनसेच्या 3 पदाधिकाऱ्यांवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी येथील कंपनीतील आर्थिक व्यवहारातील अडचणींचा
फायदा घेऊन मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करून १ लाख २० हजारांची खंडणी घेतल्याचा प्रकार समार आला आहे.

banner 728x90

याप्रकरणी रत्नागिरी शहर पालिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमाल श्रीनाथ, साईश मयेकर आणि शेखर नलावडे (सर्व रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

रत्नागिरी एमआयडीसी येथील एका कंपनीतील मालाची विक्री हात नसल्याने, तसेच कंपनीत काही ला कांचे वेतन देणे बाकी आहे. या कंपनीतील काही लाकांनी काम साडून दिल्याने ही कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे.

या अडचणींचा फायदा घेऊन मनसेच्या अमाल श्रीनाथ, साईश मयेकर व शेखर नलावडे या तीन पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात येऊन दमदाटी करून कंपनी बंद पाडण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अमाल श्रीनाथ याने कंपनीतील एकाकडून एक लाख रुपये घेतले, तसेच कंपनीतील एका महिला गुंतवणूकदाराकडून दानवेळा प्रत्येकी दहा हजार असे एकूण १ लाख २० हजार रुपये जबरदस्ती करून खंडणी घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी पालिसांनी तिघांवर भारतीय दंड विधान कायदा कलम ३८४, ३८५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *